व्हिडिओ
Vidhan Bhavan Fire : विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर लागली आग, आग लागण्यामागचं कारण काय?
मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशम दलाचा दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना घडली आहे. आज सोमवारी दुपारी तीन सव्वा तीन वाजेदरम्यान आग लागण्याची घटना घडली. विधानभवनातील ज्या ठिकाणाहून अभ्यागतांना सोडले जाते त्याच प्रवेशद्वारावर ही आग लागली.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. तत्काळ अग्निशम दलाचा दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. दरम्यान, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.