Mumbai Marines : मरीन ड्राईव्हजवळ समुद्रात तरंगते हॉटेल उभं राहणार, रेस्टॉरंट, कसिनो, बारची सुविधा

रेस्टॉरंट, कसिनो, बार अशा विविध सोयीसुविधांनी युक्त असलेले हे हॉटेल नरिमन पॉइंटपासून सुमद्रात दोन नॉटीकल मैल अंतरावर क्रुझवर साकारले जाणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मरीन ड्राईव्ह जवळील समुद्रात तरंगते हॉटेल उभारण्यात येणार आहे. रेस्टॉरंट, कसिनो, बार अशा विविध सोयीसुविधांनी युक्त असलेले हे हॉटेल नरिमन पॉइंटपासून सुमद्रात दोन नॉटीकल मैल अंतरावर क्रुझवर साकारले जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने कंत्राटदार नियुक्तीकरिता निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

गोव्याच्या धर्तीवर मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी हे 'फ्लोटेल' उभारले जाणार आहे. यापूर्वी वांद्रे येथील समुद्रात अशाच पद्धतीचे 'फ्लोटेल' उभारण्यात आले होते. मात्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचे काम सुरू असल्याने या 'फ्लोटेल'कडे जाणारी जेट्टी बंद करण्यात आली आहे. परिणामी हे 'फ्लोटेल' सध्या बंद आहे. आता त्याच धर्तीवर मरीन ड्राईव्हसमोरील समुद्रात फ्लोटेल उभारण्याची प्रक्रिया महाराष्ट्र सागरी मंडळाने सुरु केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com