Thane : ठाण्यातील आमने गावात भव्य क्रिकेट स्टेडिअम होणार

ठाण्यातील आमने गावात भव्य क्रिकेट स्टेडिअम होणार आहे. 50 एकर मोकळ्या जमिनीवर स्टेडिअम उभारणार जाणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre

ठाण्यातील आमने गावात भव्य क्रिकेट स्टेडिअम होणार आहे. 50 एकर मोकळ्या जमिनीवर स्टेडिअम उभारणार जाणार आहे. 1 लाख आसन क्षमतेचं क्रिकेट स्टेडिअम तयार करण्याचा विचार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने काढलेली खुली निविदा एमसीएने भरली आहे. त्यामुळे ठाण्यातही आता क्रिकेट स्टेडिअम होणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) ठाणे जिल्ह्यातील आमने गावात एक भव्य क्रिकेट स्टेडिअम बांधण्याची योजना आखत आहे “MC ठाण्यापासून 26 किमी आणि वानखेडे स्टेडिअमपासून 68 किमी अंतरावर असलेल्या आमने येथे सुमारे 50 एकर मोकळ्या जमिनीवर पसरलेले 1 लाख क्षमतेचे भव्य क्रिकेट स्टेडिअम तयार करण्याचा विचार करत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने काढलेली खुली निविदा एमसीएने भरली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com