Pune: कात्रज प्राणी संग्रहालयातील बिबट्या पळाला, वनविभागाकडून 24 तासांपासून बिबट्याचा शोध सुरू

पुण्यातील कात्रजच्या प्राणी संग्रालयातील पिंजऱ्यातून बिबट्या पळाल्याचा प्रकार समोर आला आहे.
Published by :
Team Lokshahi

पुण्यातील कात्रजच्या प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्यातून बिबट्या पळाल्याचा प्रकार समोर आला आहे. पकडून पिंजऱ्यात ठेवलेला बिबट्या नागरी वस्तित पळाला असल्याचा संशय आहे. बाहेर पडलेल्या बिबट्याचा युध्द पातळीवर शोध सुरु आहे. वन आणि अग्नीशामक दल बिबट्याचा शोध घेण्यासाठी कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात दाखल झाले आहेत. बिबट्या फरार होऊन 24 तास उलटले असून शोध मोहीम अजूनही सुरू आहे. बिबट्याला शोधण्यासाठी ड्रोन सुद्धा मागवण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com