Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांकडून गृहप्रकल्प कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी सोलापुरातील गृह प्रकल्प, कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला आहे.
Published by :
Team Lokshahi

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी सोलापुरातील गृह प्रकल्प, कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 19 जानेवारीला 15 हजार घरांच्या चाव्यांचे वाटप होणार आहे. चंद्रकात पाटलांनी रे नगर येथील मॉडेल घराची पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेबरोबर सोलापुरातून रॅली काढण्याची मागणी केली. पालकमंत्र्यांच्या हस्ते रेनगर येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाण्याचे जलपूजन होणार. पंतप्रधान, मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांच्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या हेलिपॅड च्या जागेची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. रे नगरचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार नरसिया अडम यांची पालकमंत्री यांनी भेट घेतली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com