Rujuta Deshmukh Angry : टोलनाक्यावर ऋजुताबाबत घडला धक्कादायक प्रकार

Rujuta Deshmukh चा टोल नाक्यावर आलेल्या अजब अनुभवाचा व्हिडीओ व्हायरल
Published by :
Team Lokshahi

मुंबई- रस्ते बनविल्यावर सरकार त्यावर टोल आकारतं. मात्र एका रस्त्यासाठी तुमचा दोनदा टोल कापला गेला तर? असाच अनुभव मराठी अभिनेत्री ऋजुता देशमुख हिला आला आहे. कामानिमित्त मराठी कलाविश्वातील कलाकार अनेकदा मुंबई- पुणे असा प्रवास करत असतात. तर पुण्यात राहणारे कलाकार हे मुंबईला येत असतात. अशात मुंबई- पुणे महामार्गावर प्रत्येकाला टोल द्यावा लागतो. मात्र एका रस्त्यासाठी दोनदा टोल कशासाठी असा प्रश्न आता ऋजुता देशमुखने उपस्थित केला आहे. ऋजुता मुंबईहून पुण्याला जात असताना तिचा दोनदा टोल कापण्यात आला. नेमकं काय घडलं हे सांगणारा एक व्हिडिओ तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com