व्हिडिओ
Dadarao Keche | माजी आमदार दादाराव केचे यांच्या नातवाचा अपघाती मृत्यू
माजी आमदार दादाराव केचे यांच्या नातवाचा भीषण अपघातात मृत्यू, रुद्राक केचे बैलगाडीला धडक बसल्याने गंभीर जखमी
वर्ध्याच्या आर्वी विधानसभेचे माजी आमदार दादाराव केचे यांच्या नातवाचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. तळेगाव आर्वी रस्त्यावर रात्रीच्या वेळी हा अपघात झाला. मृतकाचे नाव रुद्राक केचे आहे. तो आपल्या मित्रांसह आर्वी येथे घरी जात असताना बैलगाडीला धडक बसल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेत असतांनाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला.