'LOKशाही' च्या बातमीनंतर वाळू माफियांचे धाबे दणाणले; वाळू आणि गौण खनिज तस्करी करणाऱ्यांवर कारवाई

लोकशाहीच्या बातमीनंतर वाळू माफियांचे धाबे दणाणले; छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळू आणि गौण खनिज तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई.
Published by :
Prachi Nate

वाळूमाफियांवर कारवाई करण्यासाठी मदत करणं हे पोलिसांचं काम आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये वेगळाच प्रकार उघडकीस आला. वाळूमाफियांवर कारवाई करण्यास गेलेल्या तहसीलदारांना तीन तास बसवून ठेवल्याची घटना संभाजीनगमध्ये घडली. यात तीन तासांत वाळूमिफियांनी पोबारा केल्यामुळे, पोलिसांनीच वाळूमाफियांना मदत केली का? असा सवाल विचारला गेला. अशातच लोकशाही मराठीने दाखवलेल्या बातमीनंतर वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळू आणि गौण खनिज तस्करी करणाऱ्यांवर कारवाई झालेली आहे. विना क्रमाकांच्या 26 वाहनांवर दंडात्मक कारवाई झालेली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com