Actor Govinda : अभिनेता गोविंदा शिवसेनेत प्रवेश करणार? काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंची घेतली होती भेट

बॉलिवूड अभिनेता गोविंदा राजकारणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे.
Published by :
Dhanshree Shintre

बॉलिवूड अभिनेता गोविंदा राजकारणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे. कारण काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदाची भेट घेतली होती. गोविंदा याने यापूर्वी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढली होती. त्यानंतर आता गोविंदाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने तो पुन्हा राजकारणात उतरणार का हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

अभिनेता गोविंदा शिवसेनेत प्रवेश करणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदाची भेट घेतली होती. अभिनेता गोविंदा याला लोकसभा निवडणुकीकरता तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी लवकरच गोविंदा शिंदेच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com