Share Market; एक्झिट पोलनंतर अदानी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ

एक्झिट पोलनंतर शेअर बाजारात तेजी,अदानी कंपनीच्या शेअर्समध्ये सरासरी 16 टक्क्यांची वाढ झाली आहे.
Published by :
Team Lokshahi

एक्झिट पोलनंतर शेअर बाजारात तेजी, अदानी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झालेली आहे. अदानी कंपनीच्या शेअर्समध्ये सरासरी 16 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामूळे सर्वाधिक फायदा अदानी कंपनीला झालेला आहे. अदानी इंटरप्राईजेस, अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी यांच्या शेअर्समध्ये सरासरी 16 टक्क्यांची वाढ झाली आहे.

अदानी इंटरप्राईजेसच्या शेअरमध्ये तब्बल 9.27 टक्क्यांची वाढ झाली आहे. हा शेअर आता 3 हजार 743 रुपयांवर पोहोचला आहे. १ तारखेला संध्याकाळी एक्झिट पोल समोर आल्या बरोबर पुन्हा एकदा मोदी सरकार येणार याचे संकेत मिळताच शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळातं आहे. त्यामध्ये अदानी कंपनीच्या शेअर्सला मोठा फायदा होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com