Aaditya Thackeray : मराठा आरक्षणावर आदित्य ठाकरे यांची सावध भुमिका

आपल्या राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये एकतर्फी प्रेमाचं खूप आता वातावरण चालू आहे. माझं एकतर्फी प्रेम हे आमचे Municipal Commissioner प्रशासक चहल साहेंबावर आहे आणि त्यांचे प्रेम आणि मुख्यमंत्री त्यांचे प्रेम हे कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरवर आहे.
Published by :
Dhanshree Shintre

आपल्या राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये एकतर्फी प्रेमाचं खूप आता वातावरण चालू आहे. माझं एकतर्फी प्रेम हे आमचे Municipal Commissioner प्रशासक चहल साहेंबावर आहे आणि त्यांचे प्रेम आणि मुख्यमंत्री त्यांचे प्रेम हे कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरवर आहे. आपण पाहत असाल रेसकोर्सचा विषय असेल किंवी मग रस्त्यांचा विषय असेल बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर हे एवढेच त्यांची यंत्रणा चालतात आणि एवढ्या साठीच ते लोक काम करत असतात. 15 जानेवारी 2023 च्या दिवशी मी पत्रकार परिषद घेऊन हा रस्त्याचा विषय आपल्या समोर आणला आणि आपल्या माध्यमातून जनतेसमोर आणलं. मी प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक महिन्यात पत्रकार परिषद घेतले मी त्यांना प्रत्येक वेळी सांगितले आहे की हा घोटाळा आहे. आता पण दक्षिण मुंबईमधील जे कंत्राट होतं ते टर्मिनेट झालं ती व्यक्ती कोर्टात गेली. तेव्हा पुन्हा कोर्टाने सांगितले BMC ने पुन्हा एकदा पत्रकार परिषद घ्यावी. साधारणपणे 300 कोटी एवढ्या या पाच कॉन्ट्रॅक्टरकडून ड्यू आहेत पण मला वाटतं टेंडरमध्ये अशी एक प्रोव्हीजन आहे की जे जनतेचे पैसे असतील म्हणजे जे आपले पैसे असतील करदाराचे पैसे असतील जे BMC त्यांना बिल म्हणून देते त्याच्यातून ही पेनल्टी कापली जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com