Aditya Thackrey : उद्धव ठाकरेंच्या मनात सांगलीतील पराभवाची सल? आदित्य ठाकरे म्हणाले...

डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतिस्थळाचे उद्या लोकार्पण होणार आहे. कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी सोहळ्याकरता उपस्थित राहणार आहेत.
Published by :
Team Lokshahi

डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतिस्थळाचे उद्या लोकार्पण होणार आहे. कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी सोहळ्याकरता उपस्थित राहणार आहेत. तर उद्धव ठाकरे कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. उद्धव ठाकरेंच्या मनात सांगलीतील पराभवाची सल कायम आहे का? अशी चर्चा उपस्थित होत आहे.

उद्धव ठाकरेंनी खाजगी कामाचं कारण देत जाणं टाळलं आहे. मल्लिकार्जुन खरगे, पवारांसह दिग्गज नेते याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. सांगलीतील हिरासाखर कारखान्याच्या आवारात हा सोहळा पार पडणार आहे. आदित्य ठाकरे म्हणाले ज्यावेळेस महाविकास आघाडीचा वैयक्तीक कार्यक्रम असेल त्यावेळेस सगळ सांगण्यात येईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com