व्हिडिओ
Sanjay Gandhi National Park | Lion | तब्बल 14 वर्षांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जन्मला छावा
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या स्थापना दिवशी सिंहाचा जन्म, १४ वर्षांनंतर आनंदाची बातमी. 'मानसी' सिंहिणीने गोंडस बछड्याला जन्म दिला.
बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तब्बल १४ वर्षांनंतर सिंहाचा जन्म झाला असून 'मानसी' नामक सिंहिणीने गोंडस बछड्याला जन्म दिला आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास नॅशनल पार्कमध्ये ही आनंदाची बातमी मिळाली आहे.
जन्मलेल्या छाव्याचे वजन 1 किलो 300 ग्रॅम असून त्याची आणि आईचीही प्रकृती उत्तम असून दोघांनाही डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या स्थापना दिवशीच ही गोड बातमी मिळाली आहे.