Sudhir Suri Team Lokshahi
व्हिडिओ
हत्येनंतर सुधीर सूरी यांच्या हा वादग्रस्त व्हिडिओ होतोय व्हायरल
सुधीर सूरी यांनी कधीकाळी भारतातील समुदायाविरुद्ध हिंसाचाराचा पुरस्कार केला होता.
काल अमृतसरमध्ये शिवसेना नेते सुधीर सुरी यांची भरदिवसा गोळी घालून हत्या करण्यात आली. मंदिराबाहेर आंदोलन करत असताना सुरी यांची हत्या झाल्याने शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. सुधीर सूरी यांच्या निधनानंतर आता त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अमृतसरमध्ये मारले गेलेले शिवसेना नेते सुधीर सुरी हे एक प्रसिद्ध शीख विरोधी कट्टर होते, ज्यांनी कधीकाळी भारतातील समुदायाविरुद्ध हिंसाचाराचा पुरस्कार केला होता. या क्लिपमध्ये तो भारताच्या लोकसंख्येच्या फक्त 2% शिखांना नष्ट करता येईल असे त्याचे मत शेअर करताना दिसत आहे.