व्हिडिओ
Ahilyanagar Accident : क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी गेलेल्या मुलांच्या गाडीला अपघात, 2 जणांचा मृत्यू
क्रिकेट सामने पाहण्यासाठी गेलेल्या मुलांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.
(Ahilyanagar Accident ) क्रिकेट सामने पाहण्यासाठी गेलेल्या मुलांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. अहिल्यानगर -नेवासा येथे MPL क्रिकेट सामने पाहण्यासाठी गेलेल्या मुलांच्या गाडीला अपघात झाला असून यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून इतर मुले जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
जखमी मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बोदवड जिल्हा जळगाव येथे माघारी परतत असताना अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्गावर हा अपघात झाला. नेवासा गावाचे हद्दीत पहाटे 05.15 वाजण्याच्या सुमारास क्रुझर गाडीने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
हा अपघात क्रुझर चालकाच्या चुकीमुळे झाला असल्याची माहिती मिळत असून चालकावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.