पत्नीकडून मानसिक छळ; बेंगळुरूमधील AI इंजिनिअरने उचललं टोकाचं पाऊल
बेंगळुरूमधील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या ३४ वर्षीय एआय इंजिनिअर अतुल सुभाष यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांनी 24 पानांची सुसाईड नोट आणि 90 मिनिटांचा व्हिडीओ बनवून आत्महत्या केली आहे. ज्यामध्ये त्याने त्याची पत्नी आणि तिच्या कुटुंबावर त्याचा छळ केल्याचा आणि त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला आहे. मी माझ्या घटस्फोटीत पत्नीला पैसे देण्यास नकार दिला आहे. पत्नीकडून होत असलेल्या अत्याचाराबद्दल मी मृत्यूची निवड केली. मी मेल्यानंतर माझी राख न्यायालयाबाहेर गटारात राख टाकून द्या असं त्याने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
एका उच्च शिक्षित पत्नी पीडित व्यक्तीच्या आत्महत्येनंतर समाज माध्यमांवर नेटीझन्स व्यक्त होत आहेत. जस्टीस इज ड्यू आणि जस्टीस फोर अतुल सुभाष हे हॅशटॅग ट्रेंडिंग होत आहेत. #JusticeIsDue #JusticeForAtulSubhash हॅशटॅगच्या माध्यमातून अतुलला न्याय मिळावा अशी अपेक्षा नेटीझन्स करत आहेत. दरम्यान, अतुलच्या आईचा व्हिडिओ समोर आला आहे. आपल्या मुलाला न्याय मिळवून द्या. असं म्हणत अतुलच्या आईने हंबरडा फोडला आहे. अतुलच्या आईची हाक न्याय व्यवस्थेपर्यंत पोहचणं गरजेचं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लढा उभारला जात आहे.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-