व्हिडिओ
Ajit Pawar: पुतळा दुर्घटनेप्रकरणी अजित पवारांची कठोर भूमिका , म्हणाले...
अजित पवारांकडून राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेची पाहणी करण्यात आली. त्यादरम्यान पुतळा दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई होणारच असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
अजित पवारांकडून राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेची पाहणी करण्यात आली. त्यादरम्यान पुतळा दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई होणारच असं अजित पवारांनी म्हटलं आहे. तसेच चौकशी पुर्ण होऊ द्या सर्व समोर येईल असं देखील अजित पवार म्हणाले आहेत. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार अशी ग्वाही देखील अजित पवार यांनी दिली आहे.
यापार्श्वभूमीवर अजित पवार म्हणाले, या घटनेची पुर्ण चौकशी केली जाणार आहे तर चौकशीला सुरुवात देखील करण्यात आलेली आहे. कोणाला ही पाठीशी घालण्याचे काही कारण नाही हे मी स्पष्टपणे सांगतो.