पीएचडीच्या 'त्या' वक्तव्यावरुन अजित पवार यांचे स्पष्टीकरण; म्हणाले, माझ्या विधानाचा...

दोन दिवसांपूर्वी विधान परिषदेत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरील आंदोलन आणि टीकेनंतर अजित पवारांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे.

नागपूर : पीएचडीबाबत केलेल्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. पीएचडीचं शिक्षण महत्त्वपूर्ण आहे. पीएचडीबाबतच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. त्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

दोन दिवसांपूर्वी विधान परिषदेत सतेज पाटलांच्या सारथी फेलोशीपबाबतच्या प्रश्नावर बोलताना पीएचडी करून काय दिवे लावणार, असं वक्तव्य अजित पवारांनी केले होते. त्यानंतर झालेल्या आंदोलन आणि टीकेनंतर अजित पवारांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com