Ajit PawarTeam Lokshahi
व्हिडिओ
अजित पवार गटाच्या बॅनरवर यशवंतराव चव्हाण यांचे फोटो झळकले
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या होल्डिंगवर आता शरद पवार नाही तर यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहेत. शरद पवारांनी अजित पवार गटाला माझा फोटो वापरू नका असं सुनावलं होतं.आता शरद पवारांचा फोटो वगळून यशवंतराव चव्हाणांचे फोटो नाशिक मधील बॅनरवर लावण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाणांनी पवारांना मानसपुत्र मानलं होतं. चव्हाण हे देशाचे संरक्षण मंत्री झाल्यावर नाशिक मधून लोकसभेवर बिनविरोध निवडून गेले होते, त्याच ठिकाणी अजित पवार गटाने यशवंतराव चव्हाणांचे फोटो बॅनरवर लावण्यास सुरुवात केली आहे.