व्हिडिओ
Ajit Pawar | BJP | भाजपच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब; चर्चांणा उधाण | Marathi News
मुंबईमध्ये भाजपकडून लावलेल्या लाडकी बहिण योजनेच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दिसत आहे.
मुंबईमध्ये भाजपकडून लावलेल्या लाडकी बहिण योजनेच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दिसत आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नाही आहे त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. तर एकीकडे लाडकी बहिण योजनेतून अजित पवारांनी लाडकी बहिण योजनेत मुख्यमंत्री हा शब्द गाळलेला होता.
तर दुसरीकडे ज्या ज्या ठिकाणी भाजपकडून लाडकी बहिण योजनेचे बॅनर लावले गेले आहेत त्यांच्यावर अजित पवारांचा फोटो दिसत नाही आहे. तसेच बारामतीमध्ये देखील असे बॅनर लावण्यात आले होते मात्र तिथे देखील अजित पवार यांचा फोटो वगळल्याच पाहायला मिळाल. त्यामुळे महायुतीमधून अजित पवार बाहेर पडणार का अशा चर्चांनी जोर धरला आहे.