व्हिडिओ
Ajit Pawar Emotional | पुतण्याला उमेदवारी, काका भावूक! भरसभेत अजित पवार यांचा कंठ दाटला | Lokshahi
विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक घडामोडींना वेग आलं आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेते आज आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात आज महायुतीकडून अजित पवार यांनी तर महाविकास आघाडीकडून त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे बारामतीत. पवार विरुद्ध पवार ही चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. यासंदर्भातच बोलताना आज अजित पवारांनी बारामतीत मोठं विधान केलं. ‘लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करून मी चूक केली. पण आता युगेंद्र पवार यांना माझ्या विरोधात उभं करून तीच चूक त्यांनी (शरद पवार यांनी) करायला नको होती’, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. तसच भावूकही झाले.