सोलापूर जिल्ह्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; अजित पवार गटाची सरकारकडे मागणी

पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यात सरसकट दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झाला आहे.
Published by  :
Team Lokshahi

पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यात सरसकट दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झाला आहे.सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी पंढरपूर तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.

पंढरपूर तालुक्याला चार आमदार आणि दोन खासदार असून देखील दुष्काळ जाहीर होत नाही, ही खेदाची बाब असल्याचे म्हणत त्यांनी टीका केली आहे. सरकारने सरसकट दुष्काळ जाहीर न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी कल्याणराव काळे यांनी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com