Ajit Pawar : प्रत्येक चर्चेला उत्तर द्यायला मी बांधील नाही; अजित पवार माध्यम प्रतिनिधींवर संतापले

उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यम प्रतिनिधींवर संतापले आहेत, मी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे कुठेही बाईट देणार नाही असं अजित पवार म्हणाले.
Published by :
Team Lokshahi

उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यम प्रतिनिधींवर संतापले आहेत, मी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे कुठेही बाईट देणार नाही असं अजित पवार म्हणाले. तसेच ते म्हणाले प्रत्येक चर्चेला उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही असं देखील ते म्हणाले. तर आम्हाला जेवढ सांगायचं असत तेवढ आम्ही सांगतो तर काही गोष्टी अंतर्गत चर्चेच्या असतात असं देखील ते म्हणाले. अजित पवार हे टोले टिपण्णी करताना दिसतात तसेच संयमाने बोलताना दिसतात ते माध्यम प्रतिनिधींवर संतापलेले पाहायला मिळाले आहेत.

यापार्श्वभुमीवर अजित पवार म्हणाले, बैठकीत झालेली प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला सांगायलाच हवी असं काही नाही, आम्हाला जेवढ्या गोष्टी सांगायचा असतात तेवढ्या आम्ही सांगतो. तुम्ही जे चर्चेत काही पण आणाल त्याला मी उत्तर देण बांधील नाही आहे, असं अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com