Ajit Pawar News | भुजबळ, सरपंच हत्या प्रकरण; दुहेरी संकटामुळे अजितदादा नॉट रिचेबल? | Marathi News
मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि महायुतीत नाराजीनाट्याच्या चर्चा रंगू लागल्या आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळतेय. गेल्या काही तासांपासून ते कुणालाच भेटले नसल्याचंही कळतंय. नागपुरातील विजयगड निवासस्थानी काही कार्यकर्ते अजित पवारांना भेटायला गेले होते. त्यावेळी त्यांना अजित पवार हे बंगल्यावर नसल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील अजित पवार सभागृहात उपस्थित नव्हते. तर दुसऱ्या दिवशीही अजित पवार विधानभवनात दिसले नाही. अजित पवार गेल्या दोन दिवसांपासून गायब आहेत. छगन भुजबळ यांच्यासह काही नेते मंत्रिमंडळात स्थान नाही. यावरून नाराज असतानाच मात्र गायब अजित पवार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे आता अनेक राजकीय तर्क-वितर्क लढवण्यास सुरूवात झालीय.