Ajit Pawar On CM Seat | मुख्यमंत्रिपदाबाबतच्या चर्चेवरुन अजितदादांची सारवासारव | Marathi News

अमित शाहा यांच्यासोबत मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झालीच नाही, मुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चेवरुन अजितदादांनी सारवासारव करायला सुरुवात केली आहे.
Published by :
Team Lokshahi

अमित शाहा यांच्यासोबत मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झालीच नाही, मुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चेवरुन अजितदादांनी सारवासारव करायला सुरुवात केली आहे. बिहार पॅटर्नच्या चर्चेमध्ये अजिबात तथ्य नाही आहे असं अजित पवार म्हणाले आहेत. जागावाटपाचं फायनल ठरलं की तुम्हाला कलवमार असं देखील अजित पवार म्हणाले आहेत. मैत्रीपूर्ण लढतीच्या चर्चेचं वृत्त देखील अजित पवार यांनी फेटाळल्याचं समोर आलं आहे.

अजित पवार म्हणाले की, अमित शाहा यांची भेट घेतली कारण ते मुंबईत आले होते. वेगवेगळ्या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी ते आले होते. आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यात त्याच्यात बंदी होऊन द्यायची नाही. त्याच्यामध्ये आता कांद्याला शेतकऱ्याला पैसे मिळतात ते कसे मिळतात ते पाहायचं. तसेच बरेच वर्ष एमएसटीचा दर ठरलेला नाही आहे.

4 ते 5 वेळेला एफआरपी वाढली परंतू एमएसटीचा दर ठरलेला नाही हे जे काही प्रश्न होते ते प्रश्न मी माझ्या परीने सांगितले. तसेच इतर पण काही चर्चा त्याठिकाणी झाली, माझं असं मत आहे की, या मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो. आम्ही ज्यावेळेस लढती केल्या त्यावेळेस आम्ही पण कधी मैत्रीपूर्ण लढती केल्या नाही आणि महायुतीमध्ये पण असं काही होऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे.अर्थात सगळे मिळून त्याठिकाणी निर्णय घेतील पण मी माझं मत तुम्हाला सांगितलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com