Ajit Pawar On Yugendra Pawar | युगेंद्र यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयावरून अजित पवारांचा टोला

बारामतीमध्ये युगेंद्र पवारांनी अजित पवारांना आवाहन दिलं आहे. बारामतीकरांनी विधानसभा लढवण्याची संधी द्यावी आणि संधी दिल्यास समोरच्यापेक्षा जास्त विकास करून दाखवू असं युगेंद्र पवारांनी म्हटलं आहे.
Published by :
Team Lokshahi

बारामतीमध्ये युगेंद्र पवारांनी अजित पवारांना आवाहन दिलं आहे. बारामतीकरांनी विधानसभा लढवण्याची संधी द्यावी आणि संधी दिल्यास समोरच्यापेक्षा जास्त विकास करून दाखवू असं युगेंद्र पवारांनी म्हटलं आहे. स्वाभिमानी यात्रेदरम्यान युगेंद्र पवारांनी बारामतीकरांना असं आश्वासन दिलं आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी एक मोठ विधान केलं होत. बारामतीकरांना दूसरा आमदार मिळाला की त्यांना समजेल विकास कामं एवढी केली तरी बारामतीकरांनी धक्का दिला असं अजित पवार म्हणाले.

यावर अजित पवार म्हणाले की, आता सगळ्यांनाच आमदार व्हायचं आहे. तरुण लोकांना वाटतं ही आपली पहिली संधी आहे घालवता कामा नये तसचं वयस्कर लोकांना वाटतं ही आपली शेवटची संधी आहे घालवता कामा नये आणि मधले म्हणतात आम्ही किती दिवस मधल्या मध्येच राहायचं असं या लोकांना वाटायला लागलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com