Alandi Band : 'या' कारणासाठी ऐन कार्तिकी सोहळ्यात आळंदी बंद! लाखो वारकऱ्यांची गैरसोय

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळ्याची आज सुरुवात होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळ्याची आज सुरुवात होत आहे. पहिल्याचं दिवशी आळंदीनगरी बंदची हाक स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे. त्यामुळं लाखो वारकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आळंदी देवस्थानच्या तीन विश्वस्तांची निवड नुकतीच करण्यात आली. यात योगी निरंजननाथ, ऍड. राजेंद्र उमाप आणि डॉ भावार्थ देखणेंचा समावेश आहे.

मात्र स्थानिकांना पुन्हा एकदा डावलण्यात आलं. म्हणूनच आळंदीकर आक्रमक झालेत. त्यांनी संजीवन समाधी सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी बंद पुकारून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संत नामदेव, संत पांडुरंग आणि संत कुंडलिक यांची पालखी लाखो वारकऱ्यांसह अलंकापुरीत दाखल होतात. अशावेळी आळंदी बंद ठेवली जाणार असल्यानं, वारकऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. हे पाहता देवस्थानने आळंदीनगरी बंद ठेऊ नये, असं आवाहन ही केलेलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com