MLA London Tour : सर्वपक्षीय आमदार लंडन दौऱ्यावर, विदेशात भरणार सुशासनाचा 'क्लास'!

MLA London Tour : सर्वपक्षीय आमदार लंडन दौऱ्यावर, विदेशात भरणार सुशासनाचा 'क्लास'!

महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आमदारांचे शिष्टमंडळ आज लंडनसाठी रवाना होत आहे. या शिष्टमंडळात भाजप, काँग्रेस,शिवसेना उबाठा, समाजवादी पक्षाच्या आमदारांचा समावेश आहे.
Published by  :
Team Lokshahi

महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आमदारांचे शिष्टमंडळ आज लंडनसाठी रवाना होत आहे. या शिष्टमंडळात भाजप, काँग्रेस,शिवसेना उबाठा, समाजवादी पक्षाच्या आमदारांचा समावेश आहे. लंडनमधील वेल्स ट्रिनिटी सेंट डेव्हिड विद्यापीठात सोमवारी 20 नोव्हेंबर ते शनिवारी 25 नोव्हेंबर पर्यंत हे आमदार सुशासन आणि सार्वजनिक धोरण या विषयाचे धडे गिरवतील. याशिवाय वेल्स विद्यापीठाच्या लॅम्पीटर कॅम्पसमध्ये, विविध सांस्कृतिक कार्यक्रमात आमदार सहभागी झाल्याचे पाहायला मिळेल. या दौऱ्यात कार्डिफमधील सेनेड असेंब्लीला आणि वेस्टमिन्स्टर येथील संसदेच्या सभागृहांना देखील आमदार भेट देणार आहेत. येथील व्हाईट हॉलमधील नॅशनल लिबरल क्लबमध्ये या दौऱ्याची सांगता होणार आहे.

भाजप, शिवसेना शिंदे गट, उबाठा गट, काँग्रेस आणि सपाच्या आमदारांचा या दौऱ्यामध्ये समावेश आहे. आमदारांमध्ये अमित साटम, रईस शेख, मिहीर कोटेचा, अंबादास दानवे, अमिन पटेल, सत्यजित तांबे, जयकुमार रावल, पंकज भोयर, झीशान सिद्दिकी, अमित झनक, अस्लम शेख, मंगेश चव्हाण यांचा समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com