Sassoon Hospital : ससून रुग्णालयातील डॉक्टरने रुग्णाच्या नातेवाईकाकडे पैसे मागितल्याचा आरोप

ससून रुग्णालयातील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टरने रुग्णाच्या नातेवाईकाकडे पैसे मागितल्याचा आरोप केला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

ससून रुग्णालयातील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टरने रुग्णाच्या नातेवाईकाकडे पैसे मागितल्याचा आरोप केला आहे. औषध उपचाराच्या नावाखाली पैसे मागितले असल्याचं कळलं. रुग्णाच्या नातेवाईकाकडे 24 हजार 500 रुपयांची मागणी केली आहे असा आरोप आहे. पैशांची मागणी केल्याचा व्हिडीओ लोकशाही मराठीच्या हाती लागलेला आहे. स्टेशन परिसरामध्ये तेजपाल मेडिकलमध्ये 24 हजार 500 रुपये जमा करा असं म्हणत डॉक्टरांनी पैशांची मागणी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com