Anil Deshmukh: अमर काळे 2 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार; देशमुखांनी दिली ही माहिती

वर्धा लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Published by :
Sakshi Patil

वर्धा लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार स्वतः उपस्थित राहणार आहे. अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.

अमर काळे हे राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर ही निवडणूक लढणार आहेत. उद्या वर्धा येथे शक्ती प्रदर्शन करून अमर काळे आपला उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com