Ambadas Danve meet Chandrakant Khaire: अंबादास दानवेंनी घेतली चंद्रकांत खैरेंची भेट

लोकसभेचे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी अंबादास दानवे खैरेंच्या निवासस्थानी पोहचले.
Published by :
shweta walge

लोकसभेचे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे पुन्हा एकत्रित आल्याने अनेक चर्चाणा पूर्णविराम लागलं आहे. अखेर अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्या नाराजीनाट्य संपल्य़ाच दिसून आलं आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंबादास दानवे नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होत्या. अंबादास दानवेंनी संभाजीनगरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा अनेकदा व्यक्त करुन दाखवली होती. तसचं अंबादास दानवे भाजपमध्ये प्रवेश करणार की काय अशा चर्चा देखील रंगल्या होत्या. मात्र, उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असलेल्या अंबादास दानवेंची ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंकडून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com