व्हिडिओ
Ambadas Danve on BJP | भाजपला राज्याशी काही घेणंदेणं नाही, सत्तास्थापनेच्या विलंबावर दानवेंची टीका
भाजपला राज्याशी काही घेणंदेणं नाही, सत्तास्थापनेच्या विलंबावर अंबादास दानवेंची टीका. महायुती सरकारमधील मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब, 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा.
भाजपकडून राज्याच नेतृत्व अद्याप का ठरत नाही? यावर आता सवाल उपस्थित होत आहेत. सत्तास्थापनेच्या विलंबावर उद्धव ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. एकनाथ शिंदे, अजितदादांनी माघार घेतलेली नाही, भाजपाला राज्याशी काही घेणं-देणं नाही अशी टीका त्यांनी केली आहे. दरम्यान महायुती सरकारमधील मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालाय. 5 डिसेंबरला महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.