Mumbai : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर अनुयायी मुंबईत दाखल

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्या 67 वा महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाणदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी शिवाजी पार्क मैदानात जमले आहेत.
Published by :
Team Lokshahi

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्या 67 वा महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाणदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी शिवाजी पार्क मैदानात जमले आहेत. चैत्यभूमीवर सर्व अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जात आहेत. अनुयायींना राहण्याची आणि त्यांच्या भोजनाची व्यवस्था मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेले आहे. शिवाजी पार्क मैदानात भव्य पंडाल उभारण्यात आले असून या परिसरामध्ये अनुयायांच्या दृष्टीने सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com