Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर शहरी पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे.
Published by  :
Team Lokshahi

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील रात्री पुण्यात दाखल होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार मुक्कामाला हॉटेलवर नसणार, मात्र देवेंद्र फडणवीस यांचा मुक्काम हॉटेल जेडब्ल्यू मेरिएटमध्ये असणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे केंद्रीय निबंधक कार्यालयाच्या 'सहकार से स्रमृद्धी' या वेब पोर्टलच्या उद्घाटन समारंभासाठी पुण्यात येत आहेत. पिंपरी चिंचवड मधील रामकृष्ण मोरे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. अमित शाह यांचा हा दौरा शासकीय असला तरी त्याकडे राजकीय दृष्टिकोनातून बघितलं जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत बराच काळ असणार आहेत. यादरम्यान त्यांच्यामध्ये कुठल्या कुठल्या विषयांवर चर्चा होते त्याबद्दल उत्सुकता आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. विधिमंडळ अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे आता अधिवेशन संपलं आहे. तेव्हा अमित शाह यांच्याकडून मंत्रिमंडळ मिळतो का? याकडे लक्ष लागून आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com