अमोल कोल्हे यांचा शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांवर हल्लाबोल ;म्हणाले गुलाबी यात्रा पुढं गेली की...

लवकरच महाराष्ट्रात मविआचं सरकार येणार असा विश्वास अमोल कोल्हेंनी व्यक्त केला आहे.
Published by :
Team Lokshahi

शिवस्वराज्य यात्रेत अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही, पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही. दिल्लीच्या बापासमोर महाराष्ट्र झुकत नाही हे लोकसभेला दाखवून दिलं

ईडी आणि सीबीआयला घाबरून अनेकांच्या भूमिका बदलल्या. महाराष्ट्र कधी विकला जात नाही, झुकत नाही हे महाराष्ट्राने दाखवून दिलं आणि आता लवकरच महाराष्ट्रात मविआचं सरकार येणार असा विश्वास देखील अमोल कोल्हेंनी व्यक्त केला आहे.

आमचा 60 ते 62 विधानसभा मतदार संघात तुतारीचा आवाज येतोय लक्षात ठेवा आज वेळ तुमची असली तरी येणारा काळ आमचाच आहे असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत. स्वामी निष्ठा काय असते हे याच मातीने दाखवलं अन् त्याच मातीत दोघांनी गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली त्यांना स्वाभिमानी जनता जागा दाखवतील असं वक्तव्य करुन कोल्हेंनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com