व्हिडिओ
Amravati Hospital News : रुग्णाच्या हातात सलाईन, अमरावतीत जिल्हा रुग्णालयाची 'ही' दुर्दशा
अमरावती रुग्णालय अनागोंदी: रुग्णाच्या नातेवाईकांनी स्वतः रुग्णाला स्ट्रेचरवर ठेवून रुग्णालयात दाखल केले.
माणसाला चीड आणणारी घटना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली आहे. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर येताना पाहायला मिळत आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी हातात सलाईन धरून रुग्णाला रुग्णालयात नेले असल्याचा धक्कादायक प्रकार अमारवती जिल्हा सामान्य रुग्णालयात घडला आहे.
नातेवाईकांना चक्क स्वतः रुग्णाला स्ट्रेचर आणून रुग्णालयात न्यावं लागलं. रुग्णवाहिकेतून स्वतः रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णांला आतमध्ये दाखल केलं. बाहेर रुग्णांना स्ट्रेचर आणण्यासाठी या ठिकाणी कर्मचारी नाहीत का? हा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.