Beed Santosh Deshmukh : देखमुखांच्या घराजवळ अज्ञात महिलेचा वावर; कृष्णा आंधळे बाबत पुरावे असल्याचा दावा
बीड मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपुर्ण राज्यभरात खळबळ माजली होता. या हत्येचा कर्ताधर्ता वाल्मिक कराड याला देखील अटक करण्यात आली असून त्या संबंधीत आणखी माहिती समोर येत आहे. यातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार असून त्याचा शोध सुरु आहे. यादरम्यान आता आणखी एक ट्वीस्ट समोर येत आहे.
मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांच्या घराच्या परिसरात अज्ञात महिला कृष्णा आंधळेचे माझ्याकडे पुरावे आहेत म्हणत ठाण मांडून बसली. कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहतो, माझ्याकडे अनेक पुरावे आहेत, असा दावा सुरुवातीला महिलेने केला. मात्र पोलीस आल्यानंतर तिने तिचं नाव सांगण्यास देखील नकार दिला.
तिने देशमुखांच्या घरातील बाथरूम वापरण्यासाठी द्यावं, अशीही मागणी केली. दुसऱ्या बाथरुमची सोय करून दिल्यानंतरही देशमुखांच्या घरातीलच बाथरूममध्ये आपल्याला अंघोळ करायची आहे, असा हट्ट तिने धरला होता. यानंतर ती देशमुखांच्या घराच्या परिसरात बसून राहिली. रात्रभर पॅंडोलमध्ये झोपली, अखेर सकाळी केज पोलीस येताच महिलेने बसमध्ये बसून पळ काढला आहे.