'त्या' प्रकरणात आव्हाडांनी कुठं कुठं डोकं टेकवलं; परांजपेंचा पलटवार
ठाणे : राष्ट्रवादीचं दोन दिवसांचं चिंतन शिबीर कर्जत येथे आयोजित करण्यात आलं होतं. आमच्या वक्त्यांनी मागच्या काळात काय घडलं ते सांगितलं. मुख्यमंत्री गुवाहाटीला गेल्यावर काय झालं काय घडलं हे सर्व सांगितलं. आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन बेछुट आरोप केले. सूरज परमार आत्महत्या प्रकरणात आव्हाड कुठे कुठे डोकं टेकवायला गेले ते आम्हाला माहित आहे, असा पलटवार आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाडांवर केला आहे.
परमार प्रकरणात काय घडलं होतं. हे नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे ज्यांचं या प्रकरणात नावं कस आलं हे ते येत्या काळात सांगणार आहेत. अजित दादा, धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत असतांना आपण काय काय कृत्य केलं? करमुसे प्रकरण कस घडलं, त्याला कशा प्रकारे मारहाण केली हे सर्वांना माहित आहे. आपण काचेच्या घरात राहत असतांना दुसऱ्यांच्या घरावर दगडी मारू नका, असा खोचक सल्लाही परांपजेंनी आव्हाडांना दिला आहे.