Anandraj Ambedkar : आनंदराज आंबेडकर निवडणुकीच्या मैदानात, अमरावतीतून लढणार, लोकशाहीला प्रतिक्रिया

वंचित बहुजन आघाडी आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे. आनंदराज आंबेडकर निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

वंचित बहुजन आघाडी आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे. आनंदराज आंबेडकर निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. अमरावती लोकसभेसाठी आनंदराज आंबेडकर आज 11 वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी अंजली आंबेडकर आणि मुलगा सुजात आंबेडकर उमेदवारी अर्ज भरण्यावेळी उपस्थित राहणार आहेत. वंचित आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देणार असल्याची माहिती अमरावतीत प्रकाश आंबेडकर मोठी खेळी करण्याची शक्यता आहे. अमरावती लोकसभेचे वंचितच्या उमेदवार प्राजक्ता पिल्लेवाण यांची वंचितने उमेदवारी घोषित केली होती.

आनंदराज आंबेडकर म्हणाले की, मी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी त्यांच्या उमेदवारसुद्धा मागे घेतल्या आहेत. त्यामुळे एक अत्यंत उत्साहाच वातावरण अमरावती लोकसभेत निर्माण झालेलं आहे. आता उमेदवारी अर्ज भरायला मी थोड्याच वेळात निघणार आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये उत्साहाच वातावरण झालेलं आहे. वंचित पाठिंबा देणार असल्याचा आनंदराज यांचा दावा आहे. मी रिपब्लिकन सेनेचेच्या वतीने तो फॉर्म भरत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com