Anna Hazare: अण्णा हजारे यांनी बजावला मतदानाचा हक्क, मतदानानंतर दिली माध्यमांना प्रतिक्रिया

देशातील 10 राजांमध्ये 96 जागांसाठी आज मतदान होत आहे.
Published by :
Sakshi Patil

देशातील 10 राजांमध्ये 96 जागांसाठी आज मतदान होत आहे. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी देखील मतदान केलं आहे. अहमदनगर मतदारसंघात आज मतदान होत आहे.

यावेळी अण्णा हजारे म्हणाले की, "लोकांनी प्राणांचे बलीदान दिलं, फासावर गेले, 1857 ते 1947, 90 वर्ष बलीदान करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते स्वातंत्र्य ठेवायचे असेल तर मतदाराची जबाबदारी फार महत्वाची आहे. जागरूक मतदार हाच लोकशाहीचा आधार आहे. मतदार जागरूक होईल त्या दिवशी देशामध्ये लोकशाही खऱ्या अर्थाने जागरूक होईल."

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com