Pooja Khedkar : API श्रीदेवी पाटलांनी पूजा खेडकरांना दिली नोटीस ; उद्या जबाब नोंदवण्याचे आदेश

पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना दिली दुसरी नोटीस पाठवल्याची माहिती समोर येत आहे.

पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना दिली दुसरी नोटीस पाठवल्याची माहिती समोर येत आहे. वाशिम पोलिसांच्या एपीआय श्रीदेवी पाटील यांनी पूजा खेडकर यांची भेट घेऊन नोटीस दिली. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळाचे आरोप केल्या संदर्भात पूजा खेडकर यांना उद्या पुणे येथे जबाब नोंदवण्यासाठी दुसरी नोटीस दिल्याची माहिती समोर आली आहे.

पूजा खेडकर यांना याआधी नोटीस देऊन काल पुणे येथे उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. मात्र त्या उपस्थित न राहिल्यानंतर दुसरी नोटीस दिल्याची माहिती आहे. पूजा खेडकर सध्या वाशिम येथील विश्रामगृहावर 65 तासंपासून तळ ठोकून बसल्या आहेत. उद्या जबाब नोंदवण्यासाठी पुण्यात हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com