Mumbai: शिवाजी पार्क मैदानासाठी सर्व पक्षांचे पालिकेकडे अर्ज

दादरच्या शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी सगळ्या पक्षांनी पालिकेकडे अर्ज केले असल्याची माहिती समोर आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

दादरच्या शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी सगळ्या पक्षांनी पालिकेकडे अर्ज केले असल्याची माहिती समोर आली आहे. आगमी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांचे मुंबई महापालिकेकडे राजकीय सभा आणि मेळावे घेण्यास परवानगी देण्यासंदर्भात अर्ज करण्यात आले आहे.

एप्रिल-मे मध्ये प्रचारासाठी अर्ज केल्याची माहिती आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसेची एकाच तारखेला मैदानाची मागणी झाल्याची माहिती समोर आली आहे. 17 मेसाठी दोन्ही पक्षांनी शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली आहे. तर शिवाजी पार्कसाठी पालिकेकडे अर्ज प्राप्त झाले आहेत.

शिंदेंच्या शिवसेनेकडून 16 एप्रिल, 19 एप्रिल, 21 एप्रिल, 3 मे आणि 5 मे, 7 मेसाठी अर्ज करण्यात आले आहेत. तर राष्ट्रवादीकडून 22 एप्रिल, 24 एप्रिल, 27 एप्रिल भाजपकडून 23 एप्रिल, 26 एप्रिल 28 एप्रिल तर मनसेकडून 17 मे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुद्धा 17 मेसाठी शिवाजी पार्क मैदानाची मागणी करण्यात आली. त्यामुळे आता कोणाचा अर्ज मंजूर होणार आणि कोणाला इथे परवानगी मिळणार त्याकडे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com