व्हिडिओ
Bike Texi : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, मुंबईत बाईक टॅक्सीला परिवहन खात्याची मंजुरी
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! परिवहन खात्याने मुंबईत बाईक टॅक्सीला मंजुरी दिली. या निर्णयामुळे रोजगाराच्या संधी वाढणार, तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष नियम लागू.
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईमध्ये बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाची मंजूरी देण्यात आली आहे. हा मोठा निर्णय परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. या निर्णयामुळे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच मुंबईचा वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील सुटणार आहे. या रॅपिडोच्या बाइक टॅक्सी सेवेला परवानगी देताना परिवहन विभागाने काही नियम व अटीदेखील लावल्या आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचनाही नमूद केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या बाईक टॅक्सी प्रवासाकरीता एका किलोमीटरसाठी ३ रुपये भाडेदर ठरवण्यात आले आहे. त्याशिवाय बाईकमध्ये जीपीएस यंत्रणा आवश्यक आहे. तसेच गाडीवर पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. . बाईक टॅक्सीचा रंग पिवळा असेल.