Advaya Hire Arrested : अद्वय हिरे अटकेत! न्यायालयात हजर करताना समर्थकांचा गोंधळ

शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना पोलिसांनी भोपाळमधून ताब्यात घेतलं होतं.
Published by  :
Team Lokshahi

शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना पोलिसांनी भोपाळमधून ताब्यात घेतलं होतं. आज त्यांना मालेगाव कोर्टात हजर करण्यात आलं आहे. दरम्यान हिरेंचे समर्थक मालेगाव कोर्टाच्या आवारात दाखल झाले असून त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून न्यायालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com