Arvind Kejriwal: अरविंद केजरीवालांच्या जामीनावर आज फैसला

अरविंद केजरीवाल यांच्या जामीनावर आज फैसला होणार आहे. सुप्रीम कोर्टात आज जामिनावर सुनावणी पार पडणार आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या जामीनावर आज फैसला होणार आहे. सुप्रीम कोर्टात आज जामिनावर सुनावणी पार पडणार आहे. केजरीवालांना जामीन मिळणार का याकडे लक्ष लागलं आहे. केजरीवाल तुरुंगातून बाहेर येणार की आतच राहणार? याचा फैसला आज होणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणीसाठी सूचिबद्ध केली आहे. केजरीवाल यांच्यावर मद्या धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करून सीबीआयने त्यांना अटक केली आहे. केजरीवाल यांनी या अटकेला आव्हान देणारी आणि जामीन मागणारी अशा दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com