Ashish Shelar on Uddhav Thackeray : वाडवडिलांच्या पुण्याईनं भगवे होते ते हिरवे झाले; शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका

दिवाळी पाडव्याला महाराष्ट्रातील राजकीय नेते टीकेचे फटाके फोडताना दिसत आहेत.
Published by  :
Team Lokshahi

दिवाळी पाडव्याला महाराष्ट्रातील राजकीय नेते टीकेचे फटाके फोडताना दिसत आहेत. भाजप नेते आशिष शेलारांनी दिवाळी पहाट कार्यक्रमात उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले आहेत. वाडवडिलांच्या पुण्याईनं जे भगवे होते ते हिरवे होत चालल्याचा टोला आशिष शेलारांनी लगावला असून दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात ठाकरे कुटुंब कुठंच दिसत नसल्याचंही शेलार म्हणाले. राम मंदिर पूर्ण होतं आहे, राम मंदिरावर टीका न करण्याची ठाकरेंना सुबुद्धी मिळो असंही ते म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com