व्हिडिओ
Ashok Dhodi Case| अशोक धोंडी प्रकरणात 4 संशयित आरोपींना LCB ने घेतलं ताब्यात; पालघर पोलिसांची कारवाई
अशोक धोडी प्रकरणात पालघर पोलिसांची मोठी कारवाई, 4 संशयित आरोपींना LCB ने घेतलं ताब्यात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे शिवसेना नेते अशोक धोडी 10 दिवसांपासून बेपत्ता.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचा समजला जाणारा शिवसेना नेता तब्बल 10 दिवसांपासून बेपत्ता आहे. मुंबईला कामानिमित्त जातो, असं सांगून 20 जानेवारीला घरातून बाहेर पडलेले अशोक धोडी घरी परतलेच नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांची धाकधूक वाढली आहे. अशोक धोडी यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात पालघर पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. 4 संशयीत आरोपींना LCBने ताब्यात घेतलं आहे. संशयितांनी मोठे खुलासे केल्याची पोलिसांची माहिती दिली आहे.