Atul Bhatkhalkar On Bhaskar Jadhav: राज्यपालांच्या अभिभाषणावर भास्कर जाधवांची टीका, भातखळकर संतापले

राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत वादंग, अतुल भातखळकर यांनी भास्कर जाधव यांच्यावर केली जोरदार टीका
Published by :
Team Lokshahi

भास्कर जाधवांच्या राज्यपालांच्या सवालावरून विधानसभेत जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. भास्कर जाधवांच्या सरकार स्थापनेच्या वक्तव्या वरून सभागृहामध्ये सत्ताधारी सदस्यांनी भास्कर जाधवांना जाब विचारला आहे. भास्कर जाधव अभिभाषणावर बोलत आहेत की, वैफल्य व्यक्त करत आहेत? असा प्रश्न अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. तर राज्यपालांवर आक्षेप घेण चुकीचं आहे असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं आहे.

राज्यपालांच्या अभिभाषणावर भास्कर जाधवांची टीका-

भास्कर जाधव म्हणाले होते की, माननीय अध्यक्ष महोदयांनी या चर्चेकरता दोन दिवसांसाठी 7 तासांची वेळ दिलेली आहे.... त्याच्यामध्ये निम्मा वेळ हा मंत्र्यांच्या भाषणासह इथे आणि याठिकाणी किती घ्यायचा ते आम्ही ठरवणार, अध्यक्ष महोदय आपण असं कस करु शकता 2 मिनिटाच्यावर आपण मला कसं बसवू शकता? अजिबात चालणार नाही....

भास्कर जाधवांच्या टीकेवर भातखळकरांच प्रत्युत्तर-

याचपार्श्वभूमीवर अतुल भातखळकर म्हणाले की, सन्मानीय ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर आपलं भाषण करत आहेत....राज्यपाल हे एखाद्या पक्षाचे सदस्य असतात, आणि त्यांनी त्यांच्या पदाची गरीमा राखली पाहिजे... असं राज्यपालांवर हेतवारोप करणारे वाक्य हे या सदनामध्ये निर्माण करता येत नाही.... त्यांच हे वाक्य आपल्या भाषणातून आपण काढून टाकाव, रेकॉर्डमधून काढून टाकाव की राज्यपाल एका पक्षाचे सदस्य असतात... हे वाक्य काढून टाकाव अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील-

तर पुढे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, ज्या पद्धतीचं वक्तव्य झालं आहे अध्यक्ष महोदय सन्मानीय सदस्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय....

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com