Babanrao Gholap : बबनराव घोलप उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?

ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप लवकरच उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे. बबनराव घोलप भाजप किंवा शिवसेनेसोबत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नाशिक : ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप लवकरच उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे. बबनराव घोलप भाजप किंवा शिवसेनेसोबत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. तर, मध्यतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती. यावरुन घोलप ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान, बबनराव घोलप यांनी पाच वेळेस देवळाली मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर, युती सरकारच्या काळात ते मंत्री होते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com