व्हिडिओ
...तर सचिन तेंडुलकरांनी भारतरत्न परत करावा; कोणी केली मागणी?
मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी केलेल्या ऑनलाईन गेमच्या जाहिरातीविरोधात बच्चू कडू आक्रमक झाले आहेत
मुंबई : मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी केलेल्या ऑनलाईन गेमच्या जाहिरातीविरोधात बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. सचिन तेंडुलकर ऑनलाईन गेमच्या जाहिरातीत भाग घेत असल्याने त्याचा निषेध म्हणून बच्चू कडू यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सचिन तेंडुलकरने जाहिरात करावी नाही तर भारतरत्न वापस करावा, अशी मागणीच कडू यांनी केली आहे.
बच्चू कडू सचिन तेंडुलकर यांना नोटीस पाठवणार आहेत. तसेच, सचिन तेंडुलकर विरोधात उद्या आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. सचिन तेंडुलकरने गेमिंगमध्ये जी काही जाहिरात केली. ती अतिशय वाईट आहे. सचिन तेंडुलकरने जाहिरात करावी नाही तर भारतरत्न वापस करावा, असे बच्चू कडू म्हणाले आहेत.